आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध:महाविकास आघाडीकडून उद्या 'महाराष्ट्र बंद'ची हाक, अनेक व्यापाऱ्यांचा बंदला विरोध, जीवनावश्यक सेवा- दुकाने सुरू राहणार

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी दिवसभर बंद राहतील.

दरम्यान, राज्यातील मुंबईसह प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांचा या बंदला विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांनी सोमवारी दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे.

बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, शेतकऱ्यांना पाठिंबा- विरेन शाह
आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरु राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणेसुद्धा जिकरीचे झाले आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असे विरेन शाह यांनी सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.

बातम्या आणखी आहेत...