आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Budget 2021 , Maharashtra Assembly Latest News And Updates, This Budget Will Take The State Forward By Giving Relief To All Elements Chief Minister Uddhav Thackeray

अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री:सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात'

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. कोरोनामुळे आधीच राज्याला मोठा फटका बसला होता. यात, अर्थसंकल्प कसा असेल, याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून होते. दरम्यान, अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती, पण रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच, आपल्याला अपेक्षित येणे किती होते आणि आले किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचे अभिनंदन करतो. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. पण, कोणतेही रडगाणे न गाता आहे त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचे काम अर्थसंकल्पाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...