आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प सोप्या शब्दांत:महसुली जमा, भांडवली खर्च म्हणजे काय? कठिण संकल्पनांचा अर्थ जाणून घ्या सोप्या भाषेत

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य व नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा, त्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी व सुरक्षित, उज्जवल भविष्य दाखवणाऱ्या अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाने अर्थसंकल्प समजून घेणे अतिशय गरजेचे असते. कारण यात केल्या जाणाऱ्या तरतुदीचा थेट त्यांच्या जीवनावर परिणाम होत असतो. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सध्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

शेतकरी कर्जमाफी, सिंचन-शिक्षणासाठी तरदूत अशा मोठ-मोठ्या घोषणांकडे सर्वांचे लक्ष असते. त्या बाबी सामान्यांच्या सहज लक्षातही येतात. मात्र, अनेक संकल्पनांचा अर्थ माहित नसल्यामुळे उर्वरित भाषणाकडे दुर्लक्षच करतात. याऊलट राज्याकडे आता किती निधी आहे, विकासकामांवर खर्च करण्याची क्षमता राज्याकडे किती आहे, राज्याने आपला खर्च किती, कुठे केला आहे, या बाबी उर्वरित अर्थसंकल्पाकडे पाहूनच समजून येतात. त्यामुळे आपण जाणून घेऊया अर्थसंकल्पातील कठिण संकल्पाचा सहजसोप्या भाषेत नेमका काय अर्थ होतो.

1. महसुली जमा
राज्याचा महसुल कोणकोणत्या क्षेत्रांमधून जमा होतो व तो नेमका किती आहे, हे महसुली जमा या शीर्षकाखाली अर्थमंत्री मांडतात. महसुली जमेचे कर महसुल व कर सोडून इतर महसुल असे दोन भाग आहेत.

2. महसुली खर्च
महसुली खर्चाचे विकास व विकासेत्तर खर्च अस दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते.

3. भांडवली खर्च
भांडवली खर्चाचेही विकास व विकासेत्तर खर्च असे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. यातही भांडवली विकास खर्च अतिशय महत्त्वाचा मानला जातो. राज्याचा आर्थिक विकास योग्य दिशेने सुरू आहे का, हे राज्याच्या एकूण बजेटमध्ये भांडवली खर्चाचे प्रमाण किती आहे. हे पाहून लक्षात येते.

4. आकस्मित निधी
राज्याच्या अर्थसंकल्पात आकस्मित निधी या शीर्षकाखालीदेखील काही निधी राखून ठेवला जातो.

बातम्या आणखी आहेत...