आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Budget Live: Maha Budget 2021। Maha Budget Speech Live। Maharashtra Assembly Latest News And Updates; Ajit Pawar's Big Announcement On Stamp Duty Exemption If A House Is Taken In The Name Of A Woman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पात महिलांसाठी काय ?:घरातील महिलेच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक महिला दिनी जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. दरम्यान, आज जागतिक महिला दिनी अजित पवारांनी जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या दुसऱ्या अर्थसंकल्पात सरकारने नवीन घराच्या मुद्रांक शुल्कात सूट देण्याची घोषणा केली आहे. पण, यात अट अशी आहे की, घर महिलेच्या नावावर असायला हवे. यावेळी अजित पवार म्हणाले की, घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. शिवाय, शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास करण्यात आल्याचेही पवार म्हणाले. दरम्यान, केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटींची तरतू करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पवारांनी संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा करत 250 कोटींचे बीज भांडवल देणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...