आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय:कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना अर्थसहाय्य; ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालक गमावलेल्या बालकांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकार करणार

राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांन अर्थसहाय्य देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबवण्याचा आणि उद्योग निरीक्षक (गट- क) संवर्गाची नामनिर्देशाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्याचा निर्णयही ठाकरे सरकारने घेतला आहे.

पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना आल्यापासून मागील दिड वर्षात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. दरम्यान, कोरोनामुळे आपले दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य सरकारने अर्थसहाय्य देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, पालक गमावलेल्या बालकांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकार करणार आहे. ज्या मुलांचे नातेवाईक त्यांचा सांभाळ करतील त्यांच्याकडे बालके ठेवली जातील. तर ज्यांचे नातेवाईक त्या बालकांना सांभाळणार नाहीत त्यांची जबाबदारी राज्य सरकार घेईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरती
ठाकरे सरकारने आज घेतलेल्या निर्णयांपैकी दुसरा निर्णय म्हणजे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापुढे जिल्हा निवड समितीकडून न करता, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृह
ठाकरे सरकारने घेतलेला तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्यातील स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबवण्यात येणा आहे. या अंतर्गत 20 वसतिगृह सुरु करण्यात येणार असून, 10 मुलांसाठी तर 10 मुलींची वसतिगृह असतील. यासाठी लागणारे 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...