आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील कोरोना रुग्णांमध्ये रोज विक्रमी वाढ होत असताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीमध्ये लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत जनतेला इशारा दिला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याकडे लक्ष वेधत तज्ज्ञ डॉक्टरांच्या कृती दलाने दोन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची शिफारस केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांकडून लॉकडाऊनचा विरोध केला जात आहे आजही त्यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, 'आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, पण आता लोकशाहीऐवजी लॉकशाही चालू आहे…म्हणजेच लॉकडाऊन', हे लॉक करायचे, ते अनलॉक करायचे असेच सुरू आहे. देशभरातून सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. मात्र, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन करण्यात येत आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुगलांच्या काळाप्रमाणे सरकारची वागणूक
'या सरकारमध्ये आपल्याला सावकारी पाहायला मिळाली. कोरोनाच्या काळामध्ये सरकारने एक नवा पैसा तर कोणाला दिला नाही. मात्र वीज बिलाची वसूली अशा प्रकारे केली, ज्या प्रकारे मुगलांच्या काळामध्ये कर वसूल होत होता. अशा प्रकारे या सरकारने कोरोना काळात वीज बिलाची वसूली केली आहे. सध्या निवडणुका सुरू आहे म्हणून पंढरपुरात वीजेचे कनेक्शन कापलेले नाही. मात्र 17 तारीख संपूद्या वीजेचे कनेक्शन कापण्यास सुरूवात होईल.' असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.