आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील लॉकडाऊनमध्ये वाढ:15 मे पर्यंत वाढवला लॉकडाऊनचा कालावधी, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अधिकृत घोषणा करतील

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. पण, आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, लॉकडाऊन येत्या 15 मे पर्यंत कायम असणार आहे.

आज राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत वाढती रुग्ण संख्या पाहता आणखी 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल सहमती दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच या निर्णयाची घोषणा करतील.

महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लसीकरणाविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...