आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona Lockdown, News And Updates; Our Support To The Decision Of The State Government Devendra Fadnavis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी लॉकडाऊनला भाजपचा पाठींबा:राज्य सरकारच्या निर्णयाला आमचा पाठींबा- देवेंद्र फडणवीस

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात उद्यापासून वीकेंड लॉकडाऊन

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद असणार आहे. हे नवीन नियम उद्या(दि.5 एप्रिल)पासून 30 एप्रिलपर्यंत असणार आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. 'या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा असून, राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे', असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयांमध्ये बेडची संख्या कमी आहे. यावर सरकारने लक्ष घालावे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे हाल होणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांसाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी. यासोबतच, राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. याशिवाय, राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीकाही त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...