आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराराष्ट्रात दिवसभरात ३६२३ नव्या कोरोना रुग्णांची आणि ४६ मृत्यूची नोंद झाली. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी २९७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात झालेल्या ५ कोटी ५९ लाख ७९ हजार ८९८ कोरोना चाचण्यांपैकी ६४ लाख ९७ हजार ८७७ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ६४ लाख ९७ हजार ८७७ कोरोना रुग्णांपैकी ६३ लाख ५ हजार ७८८ बरे झाले.
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. कोरोनामुळे राज्यात १ लाख ३८ हजार १४२ मृत्यू झाले तसेच इतर कारणांमुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांपैकी ३५४७ जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य शासन म्हणाले.
महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ५० हजार ४०० कोरोना सक्रिय रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुळे राज्यातील २ लाख ९८ हजार २०७ जण होम क्वारंटाइन तर १८९२ संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ११.६१ टक्के, रिकव्हरी रेट ९७.०४ टक्के आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.