आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 3.66 लाखांवर; राज्यातील 8 हजार 200 पेक्षा जास्त पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 7,227 रुग्णांची कोरोनावर मात, तर 257 रुग्णांचा मृत्यू

राज्यात शनिवारी 9,251 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा 3,66,368 वर पोहचला आहे. तसेच, यातील 2,07,194 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 1,45,481 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील 8,200 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात आतापर्यंत 8,200 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात सात अधिकाऱ्यांसह 93 पोलिस कर्मचारी आहेत. चांगली बाब म्हणजे, 6 हजार 314 पोलिस अधिकारी ठीक झाले आहेत. तर, 93 पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.