आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात मागील 24 तासात तब्बल 13 हजार 659 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या कोरोना प्रभावित टॉप-10 देशांमध्ये सामील असलेल्या रशिया, ब्रिटन आणि जर्मनीपेक्षा जास्त आहे. राज्यातील परिस्थितीवर केंद्राने चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयाने या वाढीमागे कमी केलेली टेस्टिंग आणि हलगर्जीपना असल्याचे म्हटले आहे.
www.worldometers.info/coronavirus नुसार, जर्मनीमध्ये 10 मार्चला 12,246, रशियात 9,079, ब्रिटनमध्ये 5,926 आणि स्पेनमध्ये 6,672 नवीन रुग्ण सापडले आहेत.
3 मोठ्या शहरांमध्ये निर्बंध वाढवले
1. नागपुरमध्ये 1 आठवड्याचा लॉकडाउन
नागपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 1860 नवीन संक्रमित सापडले आहेत. तसेच, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने नागपुरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत हार्ड लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. हार्ड लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.
2. आज रात्रीपासून जळगावमध्ये जनता कर्फ्यू
जळगावमध्ये आज रात्री 8 वाजेपासून 15 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यादरम्यान इमरजेंसी सर्विस, PSC आणि दुसरी परीक्षा असलेल्या विभागांना सूट देण्यात आली आहे. यापूर्वी अमरावतीत 15 दिवसांचा लॉकडाउन आणि पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
3. औरंगाबादमध्ये वीकेंड लॉकडाउनची घोषणा
महाराष्ट्र सरकारने औरंगाबादमध्ये अंशतः लॉकडाउन लावला असून, वीकेंडवर पूर्ण लॉकडाउन असणार आहे. येथे आज(दि.11)पासून कोरोना नियमांना कडक करण्यात आले आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. हे निर्बंध 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लागू असतील.
'महाराष्ट्रामध्ये टेस्टिंग कमी केल्यामुळे रुग्ण वाढले'
निती आयोग आणि आरोग्य मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना गुरुवारी पत्रकार परीषद घेऊन कोरोना स्थितीची माहिती दिली. यादरम्यान त्यांनी राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. ICMR चे डायरेक्टर डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये टेस्टिंग कमी करणे आणि बेजबाबदारपणा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.