आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:रोजगाराच्या माहितीसाठी वेबसाइट लॉन्च, मोबाइल अॅपवर मिळणार रुग्णालयातील बेडची माहिती; आतापर्यंत 2754 पोलिसांची कोरोनावर मात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील वांद्रे हिल भागात तपासणीसाठी जाताना आरोग्य कर्मचारी,  महानगरपालिकेकडून येथे मास स्क्रीनिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. - Divya Marathi
मुंबईतील वांद्रे हिल भागात तपासणीसाठी जाताना आरोग्य कर्मचारी, महानगरपालिकेकडून येथे मास स्क्रीनिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.
  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आता 60,838 झाली आहे

राज्यात बुधवारी 3752 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यासोबतच 1672 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 100 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 20,504 झाली असून प्रत्यक्ष 53,901 रुग्ण उपचार घेत आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आता 60,838 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 5751 कोरोनाचे बळी ठरले आहेत.

आर्थिक अडचणीमुळे नाव्ह्याने संपवले जीवन 

सांगली येथे काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने 35 वर्षीय नाव्ह्याने विष प्राशन केले. कवठे महाकाळ तहसीलच्या इराली गावात राहणारे नवनाथ साळुंके यांचे सांगलीतील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. लॉकडाउनमध्ये सलून बंद असल्याने साळुंके यांचा रोजगार बुडाला होता. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सलूनची दुकाने लवकरच उघडण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हीत यामुळे ते नैराश्यात गेले होते. त्याने आपल्या 4 वर्षीय मुलाला देखील विष दिले होते. मात्र मुलाची प्रकृती बरी झाली असून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. 

2754 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात 

राज्यात आतापर्यंत 3820 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 2754 पोलिसांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे आतापर्यंत 45 पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, लॉकडाउन दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या 268 घटना घडल्या. याप्रकरणी 851 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत आयपीसी कलम 188 अंतर्गत 1 लाख 31 हजार 627 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 27 हजार 159 आरोपींना पोलिसांनी अटक केली. सोबत आरोपींकडून 7 कोटी 90 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूलण्यात आला आहे. 

रोजगाराच्या माहितीसाठी वेबसाइट सुरू केली

लॉकडाउननंतर कामगारांच्या स्थलांतरामुळे उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील नोकरीसाठी इच्छूक बेरोजगारांच्या रोजगाराची उपलब्धता आणि उद्योगांना कुशल मानव संसाधनाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी राज्याच्या कौशल विकास विभागाने www.mahaswayam.gov.in वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर बेरोजगार तरुणांना राज्यातील उद्योगांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळू शकेल. यासंदर्भात काही अडचण आल्यास जिल्हा सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधता येईल.

मोबाइल अॅपवर मिळणार रुग्णालयातील बेडची माहिती 

हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची उपलब्धतेची माहिती मुंबईकरांना आता मोबाईल अ‍ॅपवर मिळू शकेल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'एअर-व्हेंटी' नावाचे अॅप लाँच करताना आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत होईल असे सांगितले. त्या म्हणाल्या की, अ‍ॅप शहराच्या आपत्ती नियंत्रण कक्षाच्या डॅशबोर्डशी जोडला गेला असून त्याची लिंक मुंबई महानगरपालिकेच्या अ‍ॅपद्वारेही मिळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...