आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले.
याबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे, कोरोनाची ही शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. येत्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात निर्णय होईल. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात 7 व्या क्रमांकावर
महाराष्ट्रात एका दिवसात 56,286 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर 376 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 36130 लोक बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईमध्येही एका दिवसात 8,938 प्रकरणे समोर आली आणि 25 जणांचा मृत्यू झाला. राज्यात 5,21,317 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात 7 व्या क्रमांकावर आहे. आता यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिकेत समोर आली आहेत. आतापर्यंत एकूण 26,49,757 रुग्ण बरे झाले आहेत तर 57,028 जणांचा जीव गेला आहे. राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 32,29,547 पर्यंत गेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.