आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज दिवसभरात 4 हजार 141 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 4 हजार 780 कोरोनामुक्त, 145 रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दिवसेंदिवस आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. राज्यात रविवारी दिवसभरात 4 हजार 414 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे वाढणाऱ्या रुग्णांपेक्षा बरी होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दिवसभरात 4 हजार 780 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 145 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 53 हजार 182 एवढी आहे. तर आतापर्यंत एकूण 62 लाख 31 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 1 लाख 35 हजार 962 रुग्ण दगावले आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, अहमदनगर

बातम्या आणखी आहेत...