आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाबाधित रुग्णसंख्येत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात आज 26 हजार 538 नवीन कोरोना रुग्ण आढळळे आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज रुगणसंख्येने 25 हजाराचा आकडा देखील ओलांडला आहे.
दरम्यान, राज्यात 144 ओमायक्रॉन रुग्णही आढळले आहे. आतापर्यंत 797 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 330 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
आढळलेल्या रुग्णांपैकी 100 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यानंतर नागपुरात 11, ठाणे आणि पुणे शहरात प्रत्येकी 7, पिंपरी चिंचवड या ठिकाणी 6, कोल्हापुरात 5, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी 2, पनवेल आणि उस्मानाबाद या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.
मुंबईत 15,166 कोरोना रुग्ण वाढले
एकट्या मुंबईत गेल्या 24 तासांत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. मागील 24 तासांत 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑगमेंटेड रेस्ट्रिक्शनवर काम! - आरोग्य मंत्री
महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीतच राज्यात निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार अशी चर्चा होती. परंतु, राज्यात लॉकडाउन नाही तर केवळ ऑगमेंटेड रेस्ट्रिक्शन्स लावण्याच्या दिशेने काम सुरू आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सद्यस्थितीला कोरोनाच्या वाढती रुग्ण संख्या पाहता सरकारचा लसीकरण, बूस्टर डोस आणि चाचण्यावर अधिक भर असणार आहे. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी आणखी कठोर नियम करणार असल्याची माहिती बुधवारी आरोग्य मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.