आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona Update; Mumbai Pune Coronavirus Cases Update | Maharashtra Nagpur Nashik Aurangabad Mumbai Pune Amravati Jalgaon Beed Parbhani Corona Cases District Wise Today News

कोरोना महाराष्ट्रात जीवघेणा:आतापर्यंत राज्यात 90 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू, मागच्या 2 महीन्यात 36 हजारांनी सोडले प्राण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात प्रत्येक 100 संक्रमितांपैकी दोघांचा मृत्यू होतोय

महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात राज्यात 24 हजार 136 नवीन संक्रमितांची नोंद झाली असून, 36 हजार 176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट भलेही 92.76 टक्के झाला आहे, पण मृतांचा आकडा चिंताजनक आहे.

मागील 2 महीन्यात राज्यात 36 हजार 554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 25 मार्चपर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा 53 हजार 795 होता. हा फक्त तीन महिन्यात वाढून 90 हजार 349 पर्यंत पोहोचला. 19 एप्रिलनंतर राज्यात सलग 500 पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. मंगळवारी राज्यात तब्बल 601 रुग्णांचा जीव गेला.

राज्यात आतापर्यंत 56 लाख 26 हजार 155 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, यातील 3 लाख 14 हजार 368 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

दोन महीन्यातील मृतांची आकडेवारी

तारीखमृत्यू
25 मार्च53, 795
25 एप्रिल64,760
25 मे90,349

राज्यात प्रत्येक 100 संक्रमितांमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू

मागील 10 दिवसात राज्यात 9 हजार 837 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्युदर वाढून 1.6 टक्के झाला. प्रत्येक 100 संक्रमितांपैकी 2 जणांचा मृत्यू होत आहे. मृतांच्या आकड्यावरुन राज्यातील गंभीर परिस्थिती स्पष्ट होते. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मंगळवारी जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...