आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona Updates, Restrictions In State Breaks Corona Chain, With A 25% Drop In Patient Numbers Over The Month

‘ब्रेक द चेन’:निर्बंधांमुळे राज्यात कोरोना रुग्णवाढीला ब्रेक, महिनाभरात रुग्ण संख्येत 25% घट

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल-मे महिन्यातील तीन आठवड्यांत राज्यात हॉटस्पॉट शहरांतील रुग्णसंख्येत घट

नऊ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ हा लॉकडाऊनपूर्वीचा आठवडा आणि ८ मे ते १४ मे हा नुकताच संपलेला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता राज्यात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये २४.५७ टक्क्यांनी घट झाली आहे.

९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२१ या आठवड्यात राज्यात सरासरी ५८६१५ एवढे रुग्ण रोज नव्याने आढळत होते. हे प्रमाण मागील आठवड्यात ४४,२१२ इतके कमी झाले आहे. राज्यातील ३५ पैकी १७ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून सर्वाधिक ८१ टक्के घट नांदेड जिल्ह्यात झाली आहे. याच काळात मुंबईत ७७ टक्के, ठाणे जिल्ह्यामध्ये ७१ टक्के, पुण्यामध्ये २३.४७, नाशिकमध्ये ३०.४७ टक्के, तर नागपूर जिल्हामध्ये ५८.५४% घट झालेली आहे. भंडारा, नंदुरबार, लातूर, हिंगोली, गोंदिया, रायगड, जळगाव, परभणी, धुळे आणि जालना या जिल्ह्यांमध्येही सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.

सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचा आलेख

एप्रिल-मे महिन्यातील तीन आठवड्यांत राज्यात हॉटस्पॉट शहरांतील रुग्णसंख्येत घट

१८ जिल्ह्यांत मात्र रुग्णवाढीचा कल
बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, सातारा या जिल्ह्यांमध्ये मात्र सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या अजूनही लॉकडाऊनपूर्वीच्या आठवड्यापेक्षा अधिक दिसत आहे. सोलापूर, गडचिरोली, अकोला, चंद्रपूर, बीड, अहमदनगर, वाशीम, पालघर, वर्धा आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही थोड्याफार फरकाने हेच चित्र आहे.

या सप्ताहातील सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये घट

बातम्या आणखी आहेत...