आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपटेड:महाराष्ट्रात 24 तासात 8,807 रुग्णांची वाढ, तर 80 जणांचा मृत्यू, नवीन संक्रमितांचा आकडा 129 दिवसातील सर्वाधिक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीमध्ये 5 राज्यातून येणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट देणे गरजेचे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी राज्यात 8,807 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा आकडा 18 ऑक्टोबरनंतरचा सर्वाधिक आहे. तेव्हा 9,060 रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच, राज्यात बुधवारी 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मागील 56 दिवसातील सर्वाधिक आहे.

AIIMS संचालक म्हणाले- व्हॅक्सीनमध्ये बदल करण्याची गरज

दिल्ली AIIMS संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. सध्या भारतात असलेल्या व्हॅक्सीन 70%, 80%, 90% परिणामकारक आहेत. यांच्या परिणामात सामान्य कमतरता आल्यावरही त्या नवीन स्ट्रेनवर योग्य काम करतील. परंतु, डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, नवीन स्ट्रेन आल्यामुळे व्हॅक्सीनमध्येही बदल करावे लागतील. आता आपल्याला घाबरण्याची नाही, तर नवीन व्हॅक्सीनवर गांभीर्याने विचार करुन योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे.

दिल्लीमध्ये 5 राज्यातून येणाऱ्यांना निगेटिव्ह रिपोर्ट देणे गरजेचे

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे दिल्ली सरकार अलर्ट झाले आहे. आता मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबवरुन दिल्लीला येणाऱ्यांना आपली निगेटिव्ह रिपोर्ट आणणे गरजेचे असेल. हा नियम 27 फेब्रुवारीपासून 15 मार्चपर्यंत लागू असेल.

बातम्या आणखी आहेत...