आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona Virus Cases Update | Maharashtra Corona Cases District Wise Today News Live; Mumbai Nashik Palghar Nagpur Solapur Akola Satara Dhule

महाराष्ट्र कोरोना:रुग्णांचा आकडा 2.84 लाखांवर; गुरुवारी आढळले 8,641 रुग्ण तर 266 जणांचा मृत्यू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 84 हजार 281 झाला आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक 8,641 रुग्ण सापडले आहेत, तर 266 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण मृतांचा आकडा 11,194 झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 14 हजार 648 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 58 हजार 140 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

मुंबईऐवजी ठाणे बनला नवीन हॉटस्पॉट

ठाणे जिल्हा कोरोना संक्रमणाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. दररोज मुंबईपेक्षा ठाणे आणि पुण्यातत जास्त रुग्ण सापडत आहेत. वाढते संक्रमण पाहतो दोन्ही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. बुधवारी जारी राज्यातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 7 हजार 665 होती. यातील 34,006 रुग्ण ठाण्यात, 23,738 पुण्यात आणि 22,773 मुंबई जिल्यातील आहेत. याव्यतिरिक्त सोलापूर आणि जळगावमध्येही संक्रमण वाढत आहे.

60 वरुन 20 टक्के झाली मुंबईची भागीदारी, म्हणजेच राज्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 32 टक्के ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर, पुण्यातील रुग्णांची टक्केवारी 22 टक्के आणि मुंबईची टक्केवारी घसरुन 20 टक्क्यांवर आली आङे. मे महिन्यात राज्यातील एकूण संक्रमितांपैकी  60 टक्के एकट्या मुंबईतील होती.

काँग्रेसने लावला रुग्ण गायब करण्याचा आरोप

मीरा-भायंदर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मीरा-भायंदर महानगरपालिका(मनपा)वर कोरोना रुग्णांना गायब करण्याचा आरोप लावला आहे. काँग्रेस नगरसेवक जुबैर इनामदार यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून यावर उत्तर मागितले आहे. आरोपानुसार, 14 जुलै 2020 सा मीरा-भायंदर मनपाच्या कोव्हिड-19 रिपोर्टनुसार शहरात एकूण,अॅक्टिव प्रकरण आणि मृत्यू क्रमशः 5851, 1220 आणि 207 होते.

मनपा रिपोर्टनुसार 4424 रुग्ण ठीक होऊन घरी गेले आहेत. तर, राज्य सरकारच्या 15 जुलै 2020(सकाळी 10 वाजता) रिपोर्टनुसार मीरा-भायंदरमध्ये एकूण 6305 रुग्ण आहेत. म्हणजेच मनपाच्या रिपोर्टपेक्षा 454 रुग्ण जास्त. यावरुन काँग्रेसने मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर 454 रुग्णांना गायब केल्याचा आरोप लावला आहे.