आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:आज तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद, तर 44 मृत्यू; एकूण आकडा पोहचला 27 हजार 524 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापुरात दीड हजार रुग्ण बरे

राज्यात आज सर्वाधिक 1602 रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण संक्रमिंतांचा आकडा 27 हजार 524 वर गेला आहे. तसेच, आज 44 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर राज्यातील एकूण बळींची संख्या 1019 वर पोहचली आहे. यात चांगली बाब म्हणजे, 512 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर राज्यात आजापर्यंत 6059 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी 1495 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

पिंपरी जलसेन येथील तरुणाचा मृत्यू कोरोनामुळेच :

नगर शहरातील आणखी पाच जणांना कोरोनाची बाधा झाली असून जिल्ह्यात कोरोनाबाधित ६ रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या ६० झाली आहे. दरम्यान, पिंपरी जलसेन येथे नगरला उपचारार्थ नेताना मृत्यू झालेल्या एका तरुणाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जालन्यात ३ रुग्ण वाढले, ऑरेंजमधून रेड झोनमध्ये

जालना जिल्ह्यात बुधवारी तीन अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या १४ वरून १७ झाली. जिल्हा रेड झाेनमध्ये गेला. बीड, परभणी व उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झाेनमध्येच आहे. दरम्यान, बुधवारी जालना आणि औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत काेराेनाचा नवा रुग्ण आढळला नाही.

पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापुरात दीड हजार रुग्ण बरे; विभागामध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू

पुणे विभागातील १ हजार ५०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ७४२ झाली आहे, तर उपचार सुरू असलेले रुग्ण २ हजार ४३ आहेत. विभागात एकूण १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील ३ हजार २५८ बाधित रुग्ण असून १ हजार ३५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या १ हजार ७३० आहे. कोरोनाबाधित एकूण १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११७ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील २९९ कोरोनाबाधित रुग्ण असून ७२ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू झालेली रुग्णसंख्या २०८ आहे. कोरोनाबाधित एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील ४१ कोरोनाबाधित रुग्ण असून २९ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण असून ९ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या ८ आहे. एकाचा मृत्यू झाला आहे.

आजवर ४ कोटी २८ लाख लाेकांची तपासणी :

आजपर्यंत विभागामधील ९९ लाख ११ हजार ६० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्याअंतर्गत ४ कोटी २८ लाख ८० हजार २२९ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी २ हजार ४५२ व्यक्तींना तपासणीसाठी पाठवण्यात आले.

मालेगावात चार संशयितांचा मृत्यू

मालेगाव | शहरातील जीवन हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जीवन हॉस्पिटल येथे १, तर फरहान हॉस्पिटल येथे तीन संशयितांचा मृत्यू झाला. आता मालेगावातील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या ३२, तर जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३४ झाली आहे. मालेगाव तालुक्यात दाभाडी येथे व सोयगाव येथे प्रत्येकी २ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दाभाडीतील कोरोना बाधितांची संख्या आता १६ झाली आहे. तसेच सावता चौक, ताश्कंद बाग,पंचशीलनगर, दत्तनगर, कॅम्प रोड येथेही प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

सातारा जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या झाली १२४

सातारा | दहिवडी येथे कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या गुजरातमधील अहमदाबाद येथून प्रवास करुन आलेल्या एका २५ वर्षीय पुरुष व कराड येथील सैदापूर कोविड केंद्रात दाखल असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा असे एकूण २ जणांचे कोरोना बाधित अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या १२४ झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

८१ जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ४ व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ७७ असे एकूण ८१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

दिवसभरात १६ पॉझिटिव्ह, जळगाव जिल्हा २०० पार, भुसावळात २ मृत्यू

जळगाव | जिल्ह्यात काेराेनाच्या रुग्णांची संख्या २०० पार झाली असून बुधवारी नवे १६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यात जळगाव शहर आणि भुसावळ येथील प्रत्येकी आठ रुग्णांचा समावेश आहे. तसेच भुसावळ येथील दोघा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

जळगाव, भुसावळ, रावेर, धरणगाव, फैजपूर, जामनेर, चोपडा, पाचोरा येथील स्वॅब घेतलेल्या १३२ कोरोना संशयित व्यक्तीचा तपासणी अहवाल बुधवारी प्राप्त झाला. यात ११६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २०९ वर पोहोचली आहे. जळगाव शहरातील रुग्णांमध्ये पाच पुरुष तर तीन महिलांचा समावेश आहे. यात शाहूनगर येथील १० वर्षीय मुलगा व २४ वर्षाचा तरुण, आदर्शनगरातील २२ तरुण, समर्थ कॉलनीतील ३० वर्षाचा पुरुष तर रेल्वेलाइन पवननगर येथील ३० वर्षीय महिला व हरिविठ्ठल नगरातील ३८ वर्षीय महिला व सिंधी कॉलनीतील एक महिला व एक पुरुष आहे. तर भुसावळ येथील व्यक्तीमध्ये तलाठी कॉलनी, भज्जेगल्ली, जाम मोहल्ला, लाल बिल्डींग, आयेशा कॉलनी, खडकारोड याठिकाणच्या तीन पुरुष व पाच महिलांचा अशा आठ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत २९ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. भुसावळ येथील दोन कोरोनाबाधितांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या २७ वर पोहचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात ३१४, चंद्रपूरमध्ये दुसरा रुग्ण

नागपूर | नागपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३१४ वर पोहोचला आहे. तर, चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या रुग्णाची नोंद झाल्याने तेथील प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात सध्या २ हजार २५३ लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर, ४६६ लोकांना घरीच विलगीकरणात ठेवले गेले आहे. बुधवारी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३१४ वर पोहोचला. आतापर्यंत १०३ रुग्णांवर उपचार होऊन त्यांना रुग्णालयांमधून सुटी देण्यात आली. दरम्यान, बराच काळ हरित जिल्हा ठरलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. २३ वर्षीय युवती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. ९ मे रोजी ती यवतमाळमधून येथे आली होती. युवतीची आई यवतमाळमधील रुग्णालयात उपचार घेत होती. त्यामुळे आता तिच्या कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...