आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र कोरोना:रुग्णांचा आकडा 2.92 लाखांवर; शुक्रवारी आढळले 8,308 रुग्ण तर 258 जणांचा मृत्यू

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाचली आहे. शुक्रवारी(दि.17) राज्यात 8,308 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण संक्रमितांचा आकडा 2 लाख 92 हजार 589 झाला असून, आतापर्यंत 11,452 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 20 हजार480 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत तर, 1 लाख 60 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यापूर्वी गुरुवारी राज्यात सर्वाधिक 8,641 रुग्ण सापडले होते, तर 266 रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईऐवजी ठाणे बनला नवीन हॉटस्पॉट

ठाणे जिल्हा कोरोना संक्रमणाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. दररोज मुंबईपेक्षा ठाणे आणि पुण्यातत जास्त रुग्ण सापडत आहेत. वाढते संक्रमण पाहतो दोन्ही ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

60 वरुन 20 टक्के झाली मुंबईची भागीदारी, म्हणजेच राज्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 32 टक्के ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर, पुण्यातील रुग्णांची टक्केवारी 22 टक्के आणि मुंबईची टक्केवारी घसरुन 20 टक्क्यांवर आली आङे. मे महिन्यात राज्यातील एकूण संक्रमितांपैकी  60 टक्के एकट्या मुंबईतील होती.