आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Maharashtra Covid Death Update; Mumbai Pune Coronavirus Death Update | Maharashtra Nagpur Nashik Death District Wise Today News

महाराष्ट्रात 1 लाख मृत्यू:जगात दहाव्या स्थानावर महाराष्ट्र, पाच महिन्यात 50 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, राज्यात देशातील 29 टक्के मृत्यू

मुंबई13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मृत्यूची ही आकडेवारी जगातील कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहे. त्या पाठोपाठ मृत्यूच्या आकडेवारीत देखील घट पाहायला मिळत आहे. गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात कोरोनामुळे दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा जगातील टॉप टेन मध्ये असून महाराष्ट्राने मृत्यूंच्या आकडेवारीत 212 देशांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मृत्यूची ही आकडेवारी जगातील कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

भारतातील 29 टक्के मृत्यू महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासात 618 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 लाख 47 हजार 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख मृत्यू झाले असून भारतातील 29 टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात झाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त पाहायला मिळाले आहे. दरम्यान, राज्यात ऑक्सिजन, बेडस, व्हेंटीलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासला होता.

असा वाढला मृत्यूंचा आकडा

तारीखमृत्यूदिवस
17 मार्चपहिला मृत्यू-
11 जुलै 202010 हजार117
16 ऑगस्ट 202020 हजार36
15 सप्टेंबर 202030 हजार30
10 ऑक्टोबर 202040 हजार25
9 जानेवारी 202150 हजार91
18 एप्रिल 202160 हजार99
2 मे 202170 हजार14
15 मे 202180 हजार13
25 मे 202190 हजार10
6 मे 20211 लाख12

दररोज 220 लोकांचा मृत्यू
राज्यात पहिला कोरोनाबाधीत रुग्ण 9 मार्च रोजी आढळला असून पहिला मृत्यू 17 मार्च रोजी झाला होता. गेल्या 453 दिवसांत आतापर्यंत 1 लाख 130 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरासरी 220 लोकांनी आपले प्राण गमावले आहे. 31 मार्च रोजी राज्यात 302 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले होते. यामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला होता.

या पाच शहरांत सर्वात जास्त मृत्यू

 • मुंबई 14,971
 • पुणे 13,348
 • ठाणे 8,257
 • नागपूर 7,070
 • नाशिक 4,918

पहिल्या 50 हजार मृत्यू 10 महिन्यांत; दुसरे 5 महिन्यांत
राज्याच्या मृत्यू लेखा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये म्हणजे (मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यान) राज्यांत पहिल्या 10 महिन्यांत 50 हजार लोक कोरोनामुळे मरण पावले आहे. तर दुसऱ्या लाटेदरम्यान, पहिल्या 5 महिन्यांतच 50 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 2020 मध्ये 19 लाख प्रकरणे समोर आले होते. परंतु, यावर्षीच्या आतापर्यंत 40 लाखांवर रुग्णांचा आकडा पोहचला आहे.

बातम्या आणखी आहेत...