आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात महापूर:सांगलीत विध्वंसानंतर समोर आले भितीदायक चित्र; रस्ते आणि घराच्या छतावर आढळली मगर

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांगलीतील जनता या पुरामुळे आधीच त्रस्त आहे.

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापूरमुळे अनेक लोकांचा संसार उघड्यावर आले असून यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, दुसरीकडे सांगलीतून एक खूपच भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते.

परंतु, जेव्हा हळूहळू पाणी ओसरु लागले तेंव्हा घराच्या छतावर एक मगर फिरताना काही लोकांनी पाहिले. दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक मगर छतावरुन उडी मारताना दिसत आहे. यावितिरिक्त गेल्या तीन दिवसांत शहरातील विविध निवासी भागात मगरी पाण्यात फिरत असल्याचे आढळून आले आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?
सांगलीतील जनता या पुरामुळे आधीच त्रस्त आहे. अशा परिस्थितीत आता वन्य प्राण्यांच्या आगमनाने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मगर घराच्या छतावर बसलेली दिसत आहे. दरम्यान, काही लोक येथून नावेतून प्रवास करत असतात. हे सर्व पाहून ते लोक घाबरुन जातात.

बातम्या आणखी आहेत...