आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरपरिस्थितीचा आढावा:​​​​​​​साताऱ्यात पीडितांना भेटण्यासाठी पोहोचले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूरग्रस्तांसोबत बसून केले जेवण; म्हणाले - शक्य ती मदत करेल

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकसान खूप मोठे आहे, प्रत्येकाचे पुनर्वसन आवश्यक आहे

माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे बुधवारपासून राज्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. दरम्यान आज दोन्हीही नेते पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याच्या पाटन तालुक्याच्या अंबेघर आणि मोरगिरी गावांमध्ये पोहोचले होते. अंबेघर आणि मोरगिरीमध्ये 23 जुलैला भूस्खलनमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला होता.

या गावांमधील नागरिकांसाठी शासकीय शाळेत एक निवारा गृह तयार करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोरगिरी गावच्या शाळेत पीडितांची भेट घेतली आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. येथील पीडितांची भेट घेताना दुपार झाली आणि त्या दरम्यान त्यांच्यासाठी जेवण आले. यानंतर फडणवीस यांनीही त्यांच्यासोबत बसून भोजन करण्याची इच्छा व्यक्त केली.

आनंद व्यक्त करत ग्रामस्थांनी त्याच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केली पण खुर्ची टेबलावर बसण्याऐवजी माजी मुख्यमंत्र्यांनी जमिनीवर गावकऱ्यांसोबत बसून जेवण्यास सुरवात केली. प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यासह पीडितांसोबत जेवणही केले.

नुकसान खूप मोठे आहे, प्रत्येकाचे पुनर्वसन आवश्यक आहे
जेवण केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'हे नुकसान खूप मोठे आहे. प्रत्येकाचे पुनर्वसन आवश्यक आहे. शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन घर दिले जावे. या सर्व लोकांना अतिरिक्त मदत मिळावी.

बातम्या आणखी आहेत...