आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोस्तव:गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी सशर्त मान्यता; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना चांगली बातमी आहे. नियमांचे पालन करुन भाविकांना एसटीने गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची परवानगी असेल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकजण मुंबईत अडकले. कोरोना संसर्गामुळे त्यांना आपल्या मूळगावी परतता येत नव्हते. मात्र आता गणेशोत्सव हा सन ऑगस्टमध्ये येत आहे. या सणाला प्रत्येक चाकरमानी हा गावी जातोच. त्यामुळे या चाकरमान्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी, त्यांना एसटीने प्रवास करता येणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

याबाबत अनिल परब म्हणाले की, 'मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत', अशी माहिती परब यांनी दिली.