आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळांतील दिवे लुकलुकणार:राज्यातील 10671 शाळांमध्ये पुन्हा विजेचे दिवे लुकलुकणार, 5.88 कोटी रुपयांची वीज देयकांची थकबाकी भरण्यास शासनाची मंजूरी

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज देयक कोणत्या योजनेतून भरणार याबाबत कुठलीही माहिती नाही

राज्यात वीज पुरवठ्याचे देयक भरण्यासाठी जिल्हा परिषद शाळांकडे निधीच नसल्याने १०६७१ शाळांचा वीज पुरवठा कायम स्वरुपी बंद करण्यात आला आहे. मात्र आता शासनाने या शाळांमधील वीज देयक भरण्यास ५.८८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पुढील काळात या शाळांमधील वीजेचे दिवे पुन्हा लुकलुकणार आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून वीज जोडणी देण्यात आलेली आहे. मात्र वीज देयक कोणत्या योजनेतून भरावयाचे याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील शाळांकडे एकूण थकबाकी ११.९९ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे वीज कंपनीने १०६७१ शाळांचा वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद केला आहे. शाळेला वीज पुरवठाच नसल्याने अनेक शाळांमधील संगणक संच धुळखात पडले असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसविण्यात आलेले पाण्याचे फिल्टर देखील बंद पडले आहे.

दरम्यान, राज्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद असलेल्या शाळांना वीज देयक भरण्यासाठी विशेष बाब म्हणून ४ टक्के सादिल अनुदानातून ५.८८ कोटी रुपयांची रक्कम भरण्यास मान्यता दिली आहे. फक्त एका वर्षापुरतीच सदर रक्कम भरण्यास मान्यता दिली जात असल्याचेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या शाळांना १००० रुपये प्रति महिना रक्कम भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत झालेल्या शाळांनी वीज देयक भरल्यानंतर तातडीने वीज पुरवठा केला जाणार असून या शाळांमधील वीजेेचे बल्ब पुन्हा एकदा लुकलुकणार आहेत.

जिल्हानिहाय शाळा व कंसात मंजूर रक्कम पुढील प्रमाणे

राज्यात ठाणे जिल्हयात १११ शाळांसाठी ३ लाख रुपये, पालघर २०९ (५ लाख), रायगड २५१ (५.३८लाख), नाशिक ७७३ (२८ लाख) जळगाव २६६ (१७.७४ लाख), धुळे २४३ (७.१८ लाख), नंदुरबार १७१ (१०.९३ लाख), कोल्हापूर १९ (३२ हजार), सातारा ४७३ (६.२१ लाख), सांगली ६०५ (७.३२ लाख), रत्नागिरी ३२७ (१.५७ लाख), सिंधुदुर्ग ७८ (३१ हजार), पुणे ७८० (६२ लाख), सोलापुर १२३१ (४२.९४ लाख), अहमदनगर ४४६ (१८.५७ लाख), औरंगाबाद ५६९(४८ लाख), जालना ३५१ ( ६६.०५ लाख), परभणी १३७ (४२.०६ लाख), हिंगोली १७३ (२२.३१ लाख), बीड ३२० (८३.६६ लाख), लातुर ३१४ (१३.६० लाख), नांदेड ३६७ (२१.५६ लाख), उस्मानाबाद ४२६(२५.७६ लाख), अमरावती १६५ (२.४७ लाख), बुलढाणा ४५१ (१४.१५ लाख), अकोला २१६( ६.१० लाख), नागपुर ९४ (१ लाख), वर्धा ७० (६२ हजार), भंडारा ५६ (१.१७ लाख), गोंदिया १६६ (१.८४ लाख), चंद्रपुर १५५ (४.१५ लाख), गडचिरोली २८३ शाळांसाठी ८.९९ लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser