आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निर्णय बदलला:भारत-चीन वादानंतर होल्डवर गेलेल्या तीन चीनी कंपन्यांच्या करारांना महाराष्ट्र सरकारची मंजूरी

मुंबई/पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5000 कोटींच्या कराराला महाराष्ट्र सरकारने स्थगिती दिली होती
  • या तीन चीनी कंपन्या पुण्यात आपले प्रोजेक्ट सुरू करणार आहेत
Advertisement
Advertisement

भारत-चीन वादादरम्यान, चीनच्यी तीन कंपन्यांच्या होल्डवर ठेवलेल्या अॅग्रीमेंटला उद्धव सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे. 5000 कोटींच्या या कराराला भारत-चीनच्या वादानंतर स्थगिती देण्यात आली होती. या तिन्ही कंपन्या पुण्यात आपले प्रोजेक्ट सुरू करणार आहेत.

राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी सांगितले की, "यापूर्वीची आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला आज सकाळी समजले की, दोन्ही देशांमधील परिस्थिती नियंत्रणाल आणली जात आहे. आम्हाला विश्वास आहे की, या आर्थिक कराराला पुढे नेण्यात भविष्यात काही अडचण येणार नाही."

या कंपन्यांसोबत केले करार

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 15 जूनला मुंबईत झालेल्या 'मॅगनेटिक महाराष्ट्र 2.0' इन्वेस्टर मीटचे आयोजन केले होते. यात सरकारने ग्रेट वॉल मोटर्स, पीएमआई इलेक्ट्रो मोबिलिटी अँड फोटोन आणि हेल्गी इंजीनियरिंगसोबत करार केले होते. मंगळवारी भारत सीमेवर झालेल्या वादात 20 शहीद झाल्याची बातमी आली आणि महाराष्ट्र सरकारने या करारांना स्थगिती दिली.

Advertisement
0