आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी:नववी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेविना उत्तीर्ण होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून परीक्षांबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. आज अखेर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उतीर्ण करण्यात आले आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. पण, त्यावर फेरविचार करुन नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही, याबाबत येत्या एक-दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...