आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Government Transfers 65 Policemen Of Mumbai Crime Branch, Decision After Meeting Uddhav Thackeray And Anil Deshmukh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस विभागात मोठे फेरबदल:राज्य सरकारकडून मुंबई गुन्हे शाखेतील 65 कर्मचाऱ्यांसह 86 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय

महाराष्ट्र सरकारने मंगळवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेतील 65 पोलिस कर्मचाऱ्यांसह 86 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर झालेल्या या सर्वात मोठ्या बदल्या आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आपल्या सरकारी निवास्थानावर बैठक घेतली. याच्या काही तासानंतर गृहमंत्री अनिल देशमुखदेखील मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले. या दोन्ही बैठकानंतर पोलिस विभागातील बदल्यांचा निर्णय घेण्यात आला.

अँटीलिया प्रकरणात जप्त केलेल्या SUV चे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात निलंबित API सचिन वाझेची NIA कडून चौकशी सुरू आहे. वाझेंवरील संशयादरम्यान दररोज नवीन खुलासे होत आहेत. यादरम्यान राज्यातील महिला IPS अधिकारी आणि इंटेलीजेंस कमिश्नर रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिस विभागातील बदल्यांबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, पोलिस विभागात दलालांमार्फत बदल्यांचे मोठे रॅकेट चालवले जाते. यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...