आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका:'डेल्टा प्लस'व्हेरिएंटमुळे येत्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका; उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना तयारीत राहण्याचे निर्देश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिसऱ्या लाटेत असू शकतात 8 लाख अॅक्टिव्ह रुग्ण

सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना औषध आणि आरोग्य उपकरण तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात औषधांचा साठा करणे आणि आरोग्य सुविधा पुरवण्यावर जोर दिला.

तिसऱ्या लाटेत असू शकतात 8 लाख अॅक्टिव्ह रुग्ण
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेत 'डेल्टा वेरिएंट'मुळे रुग्णांची संख्या वाढली होती. आता तिसऱ्या लाटेत ही संख्या अजून वाढू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 19 लाख आणि दुसऱ्या लाटेत जवळपास 40 लाख रुग्णांची नोंद झाली. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, तिसऱ्या लाटेत आठ लाख अॅक्टिव्ह रुग्ण असू शकतात. त्यातील दहा टक्के लहान मुले असतील.

मोठ्या संख्येने सीरो सर्वे करण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांनी COVID-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा आढावा घेण्यासाठी ही विशेष बैठक बोलावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर सीरो सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी त्यांनी मागच्या लाटेतून धडा घेण्यावर जोर दिला.

बातम्या आणखी आहेत...