आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Home Minister Anil Deshmukh's Big Statement On Sushant Case, We Are Also Eagerly Waiting For The Investigation ...

हत्या की आत्महत्या ?:'आम्हीदेखील सीबीआयच्या तपासात काय निष्पन्न झाले, याची आतुरतेने वाट पाहत आहोत'- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या ? हा असा प्रश्न आहे, ज्याचे प्रत्येकाला उत्तर जाणून घ्यायचे आहे. सीबीआय सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करत आहे. यातच, अनेकजण सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री ​अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. दिड महिन्यापासून सीबीआय सुशांत प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांचा तपास कुठपर्यंत आला, त्यांना यात कोणत्या गोष्टी हाती लागल्या, याची आम्हीदेखील आतुरतेने वाट पाहत आहोत, असे देशमुख म्हणाले.

​अनिल देशमुख यांनी सोमवारी मीडियाशी बातचीतदरम्यान म्हटले की, 'सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस चांगल्या पद्धतीने करत होते. पण, अचानक त्यांच्याकडून तपास काढून सीबीआयच्या हाती सोपवण्यात आला. मला अनेकजण विचारतात सुशांतने आत्महत्या केली, की त्याची हत्या झाली. मीदेखील सीबीआय तपास कुठपर्यंत आला, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

काय आहे प्रकरण ?

यापूर्वी सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचे वकील विकास सिंह यांनीही या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी ते म्हटले होते की, या प्रकरणाचा तपास सध्या वेगळ्याच दिशेने जाताना दिसत आहे. सुशांतसिंग राजपूत 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला त्याच्यावर आत्महत्या केल्याचा संशय होता पण इतर काही परिस्थिती पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी हत्या असल्याचा आरोप केला.