आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागीट पतीचे कृत्य:साताऱ्यात पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने आपल्या घरात लावली आग, शेजारची 10 घरेही जळाली; कोट्यावधींचे नुकसान

सातारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्नीने देखील मारहाणीची तक्रार दाखल केली

साताऱ्यातील पाटण येथून एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी भांडणानंतर त्याचे घर पेटवले. रागाची आग इतकी भडकली की काही वेळातच शेजारच्या दहा घरांना घरे देखिल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि सर्व काही जळून खाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सर्व घरे मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाटण तालुक्यातील माझगाव येथील या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. माझगाव येथील रहिवासी संजय पाटील यांचे सोमवारी दुपारी पत्नी पल्लवीसोबत भांडण झाले. प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये मारहाण झाली. यानंतर संजय इतका चिडला की त्याने बाहेरून पेट्रोल आणले आणि त्याच्या घरावर शिंपडले आणि आग लावली.

शेजाऱ्यांनी आरोपींला पकडून बेदम मारहाण केली
पेट्रोलमुळे, ज्वाला इतक्या भीषण होत्या की आरोपीच्या शेजारील 10 घरांना वेढा घातला. या आगीत संजयच्या जवळच्या परिसरातील चार घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलिंडरमुळे आगीने भीषण रूप धारण केले. घटनेनंतर आरोपीला पकडले गेले आणि शेजाऱ्यांनी जबर मारहाण केली आणि नंतर त्याला ओढून पोलिस ठाण्यात नेले.

पत्नीने देखील मारहाणीची तक्रार दाखल केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत मालमत्तेचे खूप नुकसान झाले आहे, परंतु योग्य वेळी घरातून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आरोपी पती लॉक-अपमध्ये आहे आणि पत्नीने देखील त्याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रारही दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...