आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू:राज्यभरात विरोधी पक्षाकडून महाएल्गार आंदोलन, शेतकऱ्यांचे रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू, तर सदाभाऊ खोतांनी विठ्ठलाला दुधाने अभिषेक घालत घातले साकडे

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

दूध उत्पादक संघर्ष समिती आणि विरोधीपक्षांच्यावतीने राज्यभरात दूध दरवाढीच्या मागणीसाठी महाएल्गार आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. राज्यभरात ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करताना दिसत आहे. शेतकरी हे आपली दुभत्या जनावरांसह आंदोलनात उतरले आहेत. सरकारचा निशेधही केला जात आहे.

दुधाला 30 रुपये दर मिळावा, प्रती लिटर दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे अशा काही मागण्या घेत हे आंदोलन केले जात आहे. आज विरोधीपक्षाच्या हे वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी आणि दुधाला भाव द्या अशा घोषणाबाजी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी अनोखे आंदोलन केले.

सदाभाऊ खोत यांनी सकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीचा राजा पांडुरंग याच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याची सुबुद्धी दे बा विठ्ठला असे पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले.

Advertisement
0