आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक करणारी तरुणी पोलिसांच्या ताब्यात, चव्हाण यांची भेट झाली नाही म्हणून केली दगडफेक

नांदेड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दगडफेकीमुळे अशोक चव्हाण यांच्या बंगल्याच्या सुरक्षा कक्षाच्या काचेचे नुकसान झाले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या आनंद निलयम या निवासस्थानावर राडा घालून दगडफेक करणाऱ्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही तरुणी बुधवारी (ता.१) सकाळी पावणे अकराच्या सुमारास अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आजारी आईला व्हिलचेअरवर घेऊन आली आणि अशोक चव्हाण आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे म्हणून सुरक्षा रक्षकांना विचारणा केली. सुरक्षा रक्षकांनी साहेब नाहीत म्हटल्यानंतर चिडलेल्या तरुणीने गोंधळ घालत निवासस्थानावर दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. मात्र तोपर्यंत तरुणी आईसह निघून गेली होती. ही तरुणी उच्च शिक्षित असून तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही तरुणी काबरा नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. केवळ चव्हाण यांना भेटता आले नाही म्हणून या तरुणीने दगडफेक केल्याचे पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या प्रकरणी तरुणी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक झाल्याच्या घटनेने तर्क वितर्क लढविल्या जात होते मात्र, आता या घटनेला पुर्ण विराम मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...