आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेलारांचा मलिकांवर पलटवार:नवाब मलिक आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणांमधील लोकांसह दोघांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची सवयच लपवाछपवी आणि बनवाबनवीची आहे आणि त्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीरही आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्याकडे अजूनही काही माहिती असू शकते. म्हणून नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले त्या यंत्रणा मधल्या लोकांची दोघांचीही नार्को टेस्ट राज्य सरकारने करावी, दूध का दूध पानी का पानी झाले पाहिजे, अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विकास आघाडीच्या एका मंत्रांचे फुसके बार फुटत होते, त्याचे वर्णन एवढच करता येईल की, दिवाळीनंतर जो बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फोडणार आहेत तो बॉम्ब फुटण्या आधीच बॉम्बचा आवाज येण्या आधीच घाबरून मलिक यांनी कानावर हात कसे ठेवले, त्याचे चित्र, आज त्यांचा बदललेला आवाज, बदललेला चेहरा आणि बदलेला संवाद यातून स्पष्ट झाले आहे. पण तरीही दिवाळीनंतर बाँम्ब फुटेलच. कारण सत्याला कशाची ही डर असण्याचे कारण नाही.

बातम्या आणखी आहेत...