आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेलार-राज ठाकरे भेट:कृष्णकुंजवर आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटले, भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया, म्हणाले...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. ही भेट फक्त दिवाळीनिमित्त घेतली असून राज ठाकरेंना गिफ्ट दिले असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचीही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यातील मैत्री संबंध चांगले आहेत. अनेकवेळा आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र यावेळी शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचल्यावर राजकीय वर्तुळात युतीची चर्चा सुरु झाली होती. या चर्चांना आशिष शेलारांनी पूर्णविराम दिला आहे.

अशिष शेलार म्हणाले, राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांना दिवाळीच्या निमित्त एक पुस्तक भेट दिले. तसेच पुस्तकाबाबत शेलार यांनी सांगितले की, राज ठाकरेंना छानसे पुस्तक दिले. जे पेंग्विन पब्लिकेशनचे आहे. पुस्तकाचे नाव “द बुक ऑन मुवी” जगभरातील 100 अशा प्रसिद्ध चित्रपटांवर असलेले पेंग्विन पब्लिकेशनचे पुस्तक मी पाहिले होते, मला आवडले होते. दिवाळीनिमित्त त्यांना भेटून ते पुस्तक दिले. ही भेट केवळ आणि केवळ दिवाळीनिमित्त होती यामुळे इतर कोणती चर्चा झाली नाही. असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. आज पाडव्याच्या मुहूर्ताला ते नव्या घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे.

बातम्या आणखी आहेत...