आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार:तयार नसताना हात धरुन मुख्यमंत्री केले, किती हा भाबडेपणा? साहेब!

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज हे पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट करून ‘तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?’ असा टोला शरद पवारांना लगावला.

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणती भूमिका पार पाडली याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. याच वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, “द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती” अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...