आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांना तत्काळ मदत द्या:पोकळ आश्वासनांची नाही, तर तातडीच्या मदतीची गरज; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे कळकळीची विनंती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलाब चक्रीवादळामुळे राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि सीमेलगतच्या जिल्ह्यांना बसला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे तातडीने मदत करण्याची कळकळीची विनंती केली आहे.

काय म्हणाले फडणवीस?

राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळे आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही.

अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात 436 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे.

कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे.

आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे.

बातम्या आणखी आहेत...