आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास आठवलेंचा खुलासा:केंद्र सरकार ड्रग्जसंदर्भात कायदा बदलण्याच्या तयारीत! म्हणाले- ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला हवे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रात पाठवायला हवे, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला आणि दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही, त्याप्रमाणेच ड्रग्ज घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे अशा पद्धतीने विधान करीत ड्रग्ज घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील रामदास आठवले यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी एका सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकले जाते त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचे मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवता नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल, असे आठवले म्हणाले.

मलिकांवरही साधला निशाणा
समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या व्यक्तिगत आरोपांचा देखील रामदास आठवले यांनी समाचार घेतला. यावेळी आठवले यांनी मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्जसंदर्भात आरोप करावेत परंतू समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये, असे म्हटले. तसेच नवाब मलिक हे सामील असलेले सरकार हे ड्रग्जला पाठिंबा देणारे सरकार आहे असा आरोप देखील यावेळी आठवले यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...