आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर:1999 पासून बिनविरोध निवड, यंदा मात्र निवडणूक लढणार- राजेश पाडवी

सुनील सूर्यवंशी/प्रतिनिधी तळोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. तळोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आली आहे. तळोदा येथील कृषी उत्पन बाजार समीतीचे वैशिष्ट्य म्हणजे 1999 पासून ते आजतायगत मागील 25 वर्षे पासून बिनविरोध होत आली आहे.

येणाऱ्या निवडणूकीत देखील सर्वांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यमान चेयरमन उदयसिंग पाडवी यांनी बाजार समितीच्या माध्यमातून श्री. दत्त पेट्रोल पंपच्या भूमीपूजन प्रसंगी प्रतिक्रिया दिली आहे. असला तरी आमदार राजेश पाडवी यांची भूमिका महत्वाची असणार आहे. गुजरात पश्चिम महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधून व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने येत असून दर शुक्रवारी वर्षभर बाजार भरत असतो वार्षिक सर्वसाधारण उत्पन्न 52 लाख इतके आहे.

तालुक्यातील 68 ग्रामपंचायतमधून त्यातील सुमारे 22 ग्राम पंचायतमध्ये प्रशासक नेमले आहेत. त्यातून चार जणांची निवड करण्यात येईल तर शेतकरी सोसायटी मतदार संघात 11 सदस्य व व्यापारी संघामधून दोन सदस्य निवडले जातील तर हमाल मापाडी मधून एक सदस्य असे एकूण 18 सदस्य निवडले जातील,

महाविकास आघाडीचे अशासकीय सदस्य सध्या कार्यरत -

मागील काळात निवडणुकांचे वारे वाहत असल्याने साधारण सहा महिन्यांपूर्वीच महाविकासआघाडी पॅटर्न राबवत अशासकीय सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 तर राष्ट्रीय काँग्रेसचे 5 व शिवसेना 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1 असे सदस्य निवडण्यात आलेले आहेत.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष -
दरम्यान महाविकासआघाडी पटर्न तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सुरू असून भाजपकडून आता या बाबतीत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. तळोदा पंचायत समितीत काँग्रेस व भाजप यांनी संयुक्तपणे अडीच-अडीच वर्षाची सत्ता वाटून घेतली असल्याने तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या भूमिकेला महत्व असणार आहे.

या बाबतीत दैनिक दिव्य मराठीने आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की भाजपा स्वतःचे पॅनल या निवडणुकीत उभे करणार असून सोबत काही समविचारी उमेदवार देखील घेणार असून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप पूर्ण ताकदीने लढेल, अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहे.

तसेच याबाबत विद्यमान सभापती उदयसिंग पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कामी स्वतः बाजार समितीला लाखो रुपयांचा खर्च येत असतो.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व इतर अधिकारी व कर्मचारी यांना भत्ता व कागदपत्र छपाईसाठी येणारा मोठा खर्च वाचविण्यासाठी सर्व पक्षांच्या लोकांना सोबत घेऊन बिनविरोध निवडणूक करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, अशी प्रतिक्रिया सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उदयसिंग पाडवी यांनी दिली आहे.

दरम्यान, उदयसिंग पाडवी हे भाजपचे माजी आमदार तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तर सध्या सभापती पदावर आहेत. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी निवडणूक लढविणार असणार असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याने येणाऱ्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील राजकारण ढवळून निघण्याची संकेत आहेत.

या बाबतीत दिव्य मराठीने माजी क्रीडामंत्री पदमाकर वळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही यंदा बिनविरोध निवडणूक होऊ देणार नाही. तळोदा तालुक्यातील कृषी उत्पन बाजार समितीची निवडणूक झाल्यास काँग्रेसला निश्चितपणे यश मिळू शकते, म्हणून काँग्रेस स्वतः पॅनल उभे करून लढणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पद्माकर वळवी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...