आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचा पुतळा:पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा भव्य पुतळा, महिला शिल्पकार बनवतेय मेटलचा पुतळा; खासदार सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचे कौतुक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील महिला शिल्पकार सुप्रिया शेखर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भव्य पुतळा बनवला आहे. यामुळे सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकाराचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. सुप्रिया शिंदे यांनी शरद पवार यांचा 9 फुट उंचीचा मेटलचा पुतळा बनवला आहे. पुण्यातील आंबेगाव परिसरात शरद पवार यांचा हा पुतळा बनवला जात आहे.

शरद पवारांचा हा पुतळा बनवण्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आहे. हा पुतळा बनवण्यासाठी सुप्रिया शिंदे यांनी सतत 8 महिने काम केले. सुप्रिया शिंदे या महिला शिल्पकारणे अनेक पुतळे बनवले आहेत. त्यांना आतापर्यंत 3 पुरस्कार देखील मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी मेडिटेशन करत हुबेहूब पुतळा बनवण्याचा संकल्प केला. नेटवर शरद पवारांचे व्हिडिओ आणि फोटोचा अभ्यास करून हा पुतळा तयार केला.

सुप्रिया सुळेंकडून कौतुक
सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली. या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे. याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...