आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंचे महापौरांना पत्र:एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा; नितेश राणेंचे महापौरांना खरमरीत पत्र

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. एखादा पेंग्विन कमी पाळा पण मुंबईतील खड्डे बुजवा, असा सल्ला त्यांनी या पत्रात दिला आहे. गेल्या तीस वर्षापासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वसाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली, असं नितेश राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी 22 हजार कोटी खर्च करुनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपाने सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कॉट्रक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरुण विचारायला जातात. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा आमच्यावर दंडुकाशाहीचा गैरवापर करुन लाठीहल्ला केला जातो.

सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागण्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊलं उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजप युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: सस्त्यावरही उतरू, असेही राणे यांनी पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...