आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPSC चा निकाल:राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मानसी पाटील हिने मुलींमध्ये पटकावला पहिला क्रमांक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेचा निकाल आज अखेर जाहीर करण्यात आला आहे. 2019 साली ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.

राज्यसेवा आयोगाने एकूण 420 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या माध्यमातून उप जिल्हाधिकारी , तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक अशी वेगवेगळी 26 प्रकारची पदे भरली जाणार आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...