आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra News Update | Nawab Malik Explosive Claim | Nawab Malik's Explosive Claim | BJP Connection Of Manish Bhanushali In Cruise Operation

नवाब मलिकांचा स्फोटक दावा:क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन; पार्टीत अमली पदार्थ सापडलेच नाहीत, NCB चा छापा बनावट- मलिक

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर आरोप केला आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष मर्चंट हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले.

बॉलीवूड इडस्ट्रीला बदनाम करण्यात येत आहे. मलिक यांनी म्हटले आहे की, 3 ऑक्टोबरच्या रात्री आम्ही टीव्हीवर बातम्या बघितल्या की, क्रूझवर एनसीबीने रेड केली. यानंतर चर्चा सुरु झाल्या.

क्रूझवरुन आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी किरण गोसावी एक सेल्फी फोटो व्हायरल झाला होता. यानंतर एएनआयने दिल्लीच्या एनसीबीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले की, हा एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच या अधिकाऱ्याचा आणि एनसीबीचा काहीही संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जर तो व्यक्ती अधिकारी नाही तर आर्यन खानला कसा ओढून नेऊ शकतो? हे एनसीबीने स्पष्ट करावे असे मलिक यांनी म्हटलं आहे.

दुसरा आरोपी आरबाझ मर्चंटला एनसीबी मरुम शर्टमधील एनसीबी अधिकारी मनीष भानुशाली ओढत नेत आहे. हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसून तो भाजपचा नेता आहे. भानुशालीचे पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, यांच्यासोबत फोटो आहेत. याबाबतचेही स्पष्टीकरण एनसीबीला द्यावे लागेल असे मलिक म्हणाले.

एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलेच नाही, असा दवाही मलिक यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...