आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमबीर-वाझेंच्या भेटीची गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल:एखादे प्रकरण सुरू असताना त्यातील आरोपींना भेटता येत नाही, चौकशीचे दिले आदेश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या भेटीबाबत मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

वळसे पाटील म्हणाले, की परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची भेट झाली. यासंदर्भात चौकशी करणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच माहिती दिली जाईल. न्यायालयीन कोठडीत असताना बाहेरच्या व्यक्तींना भेटणे चुकीचे आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर नसताना सरकारी वाहन वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलिस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमके काय झाले, याचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...