आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरी धावणार?:एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्याचा सरकारचा निर्णय, एक वर्ष ते 10 वर्ष कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5 हजारांनी वाढ

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच एसटीच्या पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसे असेल?

1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.

2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.

3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.

4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.

काय म्हणाले अनिल परब?

विलिनीकरणाच्या मागणीवर शासनाची उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याची आहे. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करू. सरकारच्या या निर्णयामुळे तिढा निर्माण झाला होता. पण हा संप दिवसेंदिवस लांबत चालला होता. त्यामुळे राज्यातल्या ग्रामीण जनतेची, शालेय आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती.

सरकारकडून आम्ही प्रस्ताव ठेवला की विलिनीकरणाचा निर्णय समितीने दिला, तर तो आम्हाला मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंवा होईपर्यंत हा तिढा असाच कायम ठेवता येणार नाही. म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही पगारवाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे.

परिवहन मंत्र्यांकडून काल अंतरिम पगारवाढीची ऑफर
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 15 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. अशावेळी काल पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत अंतरिम पगारवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एक महत्वाची बैठक पार पडली.

बातम्या आणखी आहेत...