आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा:म्हणाले- भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले; आघाडीच्या मंत्र्यांना आता एकापाठोपाठ एक अटक होणार, राणेंचा दावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे यांना भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. तर रात्री जे करायचे ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले -
नारायण राणे बोलताना म्हणाले की, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच शरद पवारांकडे लाचार होऊन जाऊन मुख्यमंत्री पद स्विकारले. त्यानंतर शरद पवारचे आपले सर्वकाही आहेत. त्यांच्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळाले, असे उद्धव ठाकरे सांगताहेत. असे म्हणत महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी उद्धव यांनी पवारांवर केलेल्या वक्तव्याची नारायण राणेंनी आठवण करुन दिली.

संजय राऊत डोक्याविना तिथे दिसतील...
संजय राऊतांनी रात्रीचे काम दिवसा करायला सुरूवात केली आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी विचारला. दादरा नगर हवेलीतून निवडून आलेल्या कमलाबेन डेलकर यांची निशाणी बॅट घेतलेला फलंदाज होता, धनुष्यबाण नव्हता असाही चिमटा राणेंनी काढला. त्याचवेळी शिवसेनेची साधी शाखाही दादरा नगर हवेतील नसल्याचे राणे म्हणाले. तुमचा खासदार टिकवा, नाही तर नंतर कळेल की तो भाजपमध्ये गेला आहे. संजय राऊत एका खासदाराच्या जोरावर जी केंद्रात टक्कर देण्याची भाषा करत आहेत, काही दिवसांनी डोक्याविना संजय राऊत दिसतील असाही इशारा राणेंनी यावेळी दिला.

नैतिकता म्हणून महाविकास आघाडीतील सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही राणे म्हणाले. त्यांना आता तुरूंगात एकापाठोपाठ एक अटक होऊ रांग लागणार आहे. आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांना खुद्द राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावयाकडे अनेक गोष्टी मिळूनही नवाब मलिक बोलतात.

तसेच, भाजपवर, मोदींवर टीकेचा भडिमार करतायत, संपले आता यांचे म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहात. अन्यथा आठच्यावर जात नाहीत तुम्ही, असाही टोला नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला. पुढच्या लोकसभेला यांचे 25 आणि आठही निवडून येणार नाहीत अशी अवस्था आहे. त्यामुळे तोपर्यंत हात धुवून घ्या असे चालले, असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...