आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र स्पष्ट:जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; कुणाचे वर्चस्व, कोणाला किती जागा?

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 जागांचा आणि 144 पंचायत समितीच्या जागांचा निकाल घोषित करण्यात आला. मिनी विधानसभा समजल्या जणाऱ्या ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची होती.

जिल्हा परिषदेच्या सर्व 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात काँग्रेस 17, राष्ट्रवादी 17 आणि शिवसेनेने 12 अशा मिळून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या, तर भाजपने 23 जागांवर वर्चस्व राखले. उर्वरित 16 जागा अपक्ष व इतर पक्षांनी जिंकल्या आहेत.

जिल्हानिहाय निकाल, कोणत्या पक्षाने किती जागा?

अकोला 14 - भाजप 1 शिवसेना 1 राष्ट्रवादी 2 काँग्रेस 1 वंचित 9

नंदूरबार 11 - भाजप 4, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस, 3 इतर 0

धुळे 15 - भाजप 8, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2, इतर 0

नागपूर 16 - भाजप 3, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, इतर 2

वाशिम 14 - भाजप 2, शिवसेना 1, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 2, इतर 4

पालघर 15 - भाजप 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, काँग्रेस 0 इतर 1

बातम्या आणखी आहेत...