आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या वडिलांना सन्मान देणे आणि त्यांना नेहमी आपल्या जवळ ठेवण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या इंस्पेक्टर वडिलांचा सिलिकॉनचा स्टॅच्यू बनवला आहे. ही प्रतिमा सोफ्यावर बसलेल्या मुद्रेत आहे. हा पुतळा पाहून तुम्हाला खराच वाटेल. मूर्तीवर दिसणारा रंग, रूप, केस, भुवया, चेहरा, डोळे आणि शरीराचा जवळपास प्रत्येक भाग हा एखाद्या जिवंत व्यक्ती प्रमाणे दिसतो.
हे बनवून घेणाऱ्या अरुण कोरेचा दावा आहे की, हा महाराष्ट्राचा पहिला सिलिकॉन पुतळा आहे. त्यांनी हा पुतळा वडील कै.रावसाहेब शामराव कोरे यांच्या स्मरणार्थ बनवला आहे. दिवंगत रावसाहेब शामराव कोरे हे पेशाने राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक होते. गेल्या वर्षी ड्यूटी दरम्यानच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोळी समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब हे दयाळू प्रतिमेचे नेते होते, त्यामुळेच त्यांचा पुतळा पाहण्यासाठी दुरून लोक येथे येत आहेत.
पाच महिन्यांच्या मेहनतीनंतर बनवलेली ही मूर्ती
2020 मध्ये कोरे यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. कोरेंच्या मृत्यूनंतर त्याचे संपूर्ण कुटुंबाला त्यांची खूप आठवण येत होती. त्यानंतर अरुणच्या मनात सिलिकॉनचा पुतळा बनवण्याची कल्पना आली. बेंगळुरूचे मूर्तिकार श्रीधर यांनी ही मूर्ती बनवण्यासाठी पाच महिने मेहनत घेतली.
30 वर्षे असते एका सिलिकॉनच्या प्रतिमेचे वय
सिलिकॉन मूर्तीचे आयुष्य सुमारे 30 वर्षे असते. सिलिकॉन मूर्तीवर घातलेले कपडे दररोज बदलता येतात. ही मूर्ती सामान्य माणसासारखी दिसते. अरुण कोरे म्हणतात की हा पुतळा पाहून त्यांना आपल्या वडिलांची उणीव कधीच जाणवणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.