आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा मुसळधार!:राज्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता, सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कोसळणार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात येत्या 24 तासात सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस एकाच वेळी पडणार अशी वेळ क्विचितच असते. तसेच वातावरण सध्या निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.

यापूर्वी राज्यात पुढील चार ते पाच तासात जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

येत्या काही तासांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशा संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...